बीड जिल्ह्यातील परळी येथील ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात नरक चतुर्दशीच्या पवित्र दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. दिवाळीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून, संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. धार्मिक उत्साहाचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिरात दिवाळी आणि नरक चतुर्दशीच्या मंगलपर्वावर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे.