NCP Merger Politics : आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुद्धा पार्थ पवार सिल्वर ओकवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाभोवती केंद्रीत झालं आहे. येत्या काळात राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात असताना, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल त्यांना भेटायला गेलेले.