शरद पवारांसोबत रुग्णालयात नेमकी काय चर्चा झाली? याविषयी प्रफुल पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी यावेळी मोठं भाष्य केलं. शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आलं होतं. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रफुल पटेल हे भेटीसाठी पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दोन्ही नेत्यांची चर्चा झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलणं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.