जगात एका देशात एक अशी जागा आहे ज्याला बघून तुम्ही थक्क व्हाल. एका ठिकाणी असा पर्वत आहे ज्याचा रंग इंद्रधनुष्य सारखा आहे. चीनच्या गांसू प्रांतातील झांग्ये डॅनशिया नॅशनल जिओलॉजिकल पार्कमधील पर्वत त्यांच्या अनोख्या रंगांसाठी प्रसिद्ध आहेत. लाल, पिवळ्या, नारंगी, हिरव्या आणि जांभळ्या रंगांच्या छटांमुळे त्यांना 'रेनबो माउंटन्स' असे म्हटले जाते. या पर्वतांवर दिसणाऱ्या रंगीबेरंगी रेषा एखाद्या कलाकाराने काढलेल्या चित्रासारख्या भासतात. दूरून पाहिल्यावर हे पर्वत एखाद्या रंगीबेरंगी गालिच्यासारखे दिसतात.