छत्रपती संभाजीनगर : खाद्य,अन्न पदार्थात भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या २ ऑईल रिपॅकिंग युनिट, २ मिठाई व फराळ उत्पादकांचे परवाने निलंबित करण्यात आले ह. मात्र, यानंतरही नियमांची पायमल्ली करत व्यवसाय करणाऱ्या चारी आस्थापनांना एफडीएने थेट टाळे ठोकले आहे. या रेल्वेस्टेशन येथील मधुर मिलन मिठाई, साई भंडार फराळ यांच्यासह लासूर येथील दोन ऑईल रिपॅकिंग युनिटचा समावेश आहे..राज्यात सेफ फुड सेफ महाराष्ट्र या मोहिमेंतर्गत भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडका सुरू आहे.