मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणात सत्र न्यायालयाने पत्नीला मोठा दिलासा देत पोटगीच्या रकमेत दुपटीने वाढ केली. सत्र न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील अपील मंज. सत्र न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील अपील मंजूर करत पत्नी आणि मुलीसाठीची अंतरिम पोटगी मासिक २० हजार रुपयांवरून थेट ४७ हजार ५०० रुपयांवर वाढवली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुणाल जाधव हा निकाल दिला. पतीने तो महिना १ लाख २० हजार पगार घेत असल्याचा दावा केला होता.