मुंबई : केईएम रुग्णालय लवकरच वैद्यकीय शिक्षण आणि प्रगत क्लिनिकल प्रशिक्षणाचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे. बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयाच्या आवारात ४२२ कोटी खर्च. या प्रकल्पाची निविदा डिसेंबर २०२६ मध्ये काढण्याचे प्रस्तावित असून यामुळे रुग्णालयात मोठ्या शैक्षणिक पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा होणार आहे.प्रस्तावित संकुलामध्ये एकाच वेळी सुमारे ८०० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता असेल. सध्याच्या जुन्या नर्सिंग इमारतीच्या जागेवर २८ मजली आणि ३२ मजली अशा दोन गगनचुंबी इमारती उभारल्या जातील.