जळगाव लाईव्ह न्यूज । लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने जळगावच्या सराफ बाजारात आज सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीची पूजा करण्याची परंपरा असल्याने नागरिकांनी सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदीला पसंती दिली. विशेषतः लक्ष्मीच्या मूर्ती, सोन्या-चांदीचे शिक्के आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात मोठी लगबग दिसून आली. सोने खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात सणानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. घराघरांत धनाची देवता लक्ष्मीची पूजा करून सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते.