संजय महाजन, जळगाव लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने जळगावच्या सराफ बाजारात आज सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने आणि चांदीची. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने आणि चांदीची पूजा करण्याची परंपरा असल्याने नागरिकांनी सोने-चांदीच्या वस्तू खरेदीला विशेष पसंती दिली. विशेषतः लक्ष्मीची मूर्ती, सोन्या-चांदीचे शिक्के आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती..सोने खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात सणानिमित्त चांगलीच लगबग दिसून आली.