इचलकरंजी : आर्थिक वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी तलवार, कोयत्यासह केलेल्या सशस्त्र हल्ल्यात वडिलांसह तीन भाऊ जखमी झाले. यामध्ये गौरव गणेश बागडे (वय ३५) हा यु. यामध्ये गौरव गणेश बागडे (वय ३५) हा युवक गंभीर जखमी झाला. गणेश अनिल बागडे, कुणाल गणेश बागडे आणि यश गणेश बागडे अशी उर्वरित जखमींची नावे आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोरांनी तलवारीसह कोयते हातात घेऊन दहशत माजवल्याने भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.