ठाणे: जन्मदात्या आईलाच आपल्या वीस दिवसीय बाळाची अडीच लाखात विक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीसह दहा जणांच्या टोळीस मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. तर विक्री करण. तर विक्री करण्यात आलेल्या बाळाची रत्नागिरी येथून पोलिसांनी सुखरूप सुटका केली. बाळास ठाण्यात आणून त्यास डोंबिवली येथील संस्थेत पालन पोषणासाठी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली. .