डोंबिवली: झारखंडमधील फरार नक्षलवादी संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोदराई ऊर्फ बुधराम (४५) याला डोंबिवलीजवळच्या ठाकुर्ली परिसरातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अर्. झारखंड सरकारने या कुख्यात नक्षलवाद्यावर तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, एवढा मोठा बक्षीसपात्र नक्षलवादी थेट आपल्या ठाकुर्लीत लपून बसला होता, ही बातमी समजताच ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. .पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.