मुंबई: मलबार हिल येथील ऐतिहासिक फिरोजशाह मेहता उद्यानातील (हँगिंग गार्डन) परिसरातील ८४ झाडे तोडण्याचा व स्थलांतरित करण्याचा घाट मुंबई महानगरपालिकेने घातला आहे. याबाबतची सूचना थेट वर्तमानपत्रात न देता, चक्क झाडांच्याच खोडावर चिकटवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हायड्रॉलिक इंजिनिअरच्या बंगल्यासमोर, खालील जंगलात आणि गार्डनच्या कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सजवळील झाडांवर या नोटिसा दिसून आल्या आहेत..Mumbai non AC local train Trail: स्वयंचलित दरवाजाच्या पहिल्या 'नॉन-एसी' लोकलची चाचपणी.