मुंबई: मुंबईकरांचा उपनगरीय लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार, स्वयंचलित दरवाजे असलेली मुंबईत. त्यानुसार, स्वयंचलित दरवाजे असलेली मुंबईतील पहिली 'नॉन-एसी' लोकल ट्रेन शहरात दाखल झाली आहे. .१२ डब्यांच्या या अत्याधुनिक रेकची सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या विविध मार्गांवर चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच या गाडीला मध्य रेल्वेच्या नियमित प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले..