रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जाणार आहे. लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : पारधी समाजासाठी ३० कोटी, तर कातकरी, कोलाम आणि माडिया या आदिम जमातींसाठी १३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे, यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत.