वेणेगाव : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर रामकृष्णनगर (काशीळ), ता. सातारा गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे महामार्ग ओ. शुक्रवारी पहाटे महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वाहनाची धडक बसून ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे..काशीळ व परिसरातील शेतशिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. शेतकरी आणि ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.