सांगली : दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना आणि सर्वजण कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करीत असताना, सांगली जिल्ह्यातील साडेतीन हजार एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्. कर्मचाऱ्यांची रजा, सुटी २० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांची फराळाची, दिवाळी सणाच्या अंघोळीची सोय आगारातच केली आहे..सांगली जिल्ह्यात ३ हजार ६५० एसटी कर्मचारी दहाही आगारात काम करीत आहेत. यामध्ये अडीच हजारहून अधिक कर्मचारी हे वाहक आणि चालक आहेत.