उमरखेड : शहरातील लोकमान्य टिळक वॉर्डातील ट्रॅक्टर कंपनीचे विक्रेते उपचारासाठी नांदेड येथे गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी पेटीत ठेवलेल. या चोरीप्रकरणी सख्ख्या भावाविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तूंची किंमत ४२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक वॉर्डातील सचिन भास्करराव देशपांडे (वय ५०) हे ट्रॅक्टर कंपनीचे विक्रेते असून उपचारासाठी नांदेड येथे गेले होते.