करमाळा : ऐन दीपावलीच्या तोंडावर करमाळा तालुक्यातील हजारो रेशनकार्डधारकांची शासनाच्या ‘मिशन सुधार’ या मोहिमेंतर्गत तपासणी सुरू असून, आतापर्यंत तालुक्यातील ६ हज. .यामध्ये पात्रतेच्या निकषांत बसत नसल्याचे आढळलेल्या ३ हजार ४०१ रेशनकार्डांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजनेतील ३०८ आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील ३ हजार ९३ रेशनकार्डांचा समावेश आहे. या कार्डधारकांना यापुढे रेशनकार्डवरून मिळणारे धान्य व संबंधित शासकीय लाभ मिळणार नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे..