सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पंचायतराज अभियान जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत ५० लाखांचे पारितोषिक मिळवले. करमाळा तालुक्यातील. करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकासह ३० लाख रुपये, तर सांगोला तालुक्यातील चिणके ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवत २० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले..मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले. तिन्ही गावांनी उल्लेखनीय कामगिरी करीत जिल्हा परिषदेला दिवाळीची गोड भेट दिली आहे.