सोलापूर : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत एक हजारांपेक्षा जास्त कामे मंजूर आहेत. त्यातील शेकडो कामांच्या बिले देण्यासाठी शंभर कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ही बिले देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १४० कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, अद्यापही निधी न आल्याने ऐन दिवाळीत जलजीवनच्या ठेकेदारांना शिमगा करण्याची वेळ आली आहे..जलजीवनची जिल्ह्यात एक हजारांपेक्षा जास्त कामे मंजूर असून, त्यातील जवळपास साडेचारशे कामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.