सोलापूर : जिल्ह्यात जनावरांसाठीची संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय जमिनींवर चारा पिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जि. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २० लाख जनावरांसाठी दिलासा मिळणार आहे..कृषी विभागाकडून जमिनी निश्चित केल्या जात आहेत. यासाठी संबंधित जमिनींची उपलब्धता आणि आवश्यक सिंचन सुविधांचा विचार करून चारा लागवडीचे नियोजन केले जाणार आहे.