रवी हिरेमठ धारवाड : सायबर गुन्हेगारीबद्दल जनजागृती करूनही फसवणूक करणारे अनेक मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेतच.देशातील लोक दररोज कोट्यवधी रुपये गमावत आहेत. साय. सायबर भामटे ही लुटलेली रक्कम भाडोत्री खात्यांमध्ये ठेवतात आणि नंतर हवे तेव्हा ती रक्कम काढतात. अशी पाच कोटींची रक्कम हुबळीतील बँकांमधून काढली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळूर पोलिसांनी तशी माहिती हुबळी पोलिसांना कळवली असून, सीईएन विभाग तपास करत आहे..