कोल्हापूर : ढगाळ वातावरण नसल्यास करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात पूर्ण क्षमेतेने किरणोत्सव होईल, अशी माहिती खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली. दक्षिणायन. दक्षिणायन किरणोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच शनिवारी मंदिरात सूर्यकिरणांची विशेष पूर्वचाचणी घेण्यात आली. सूर्यकिरणे योग्य दिशेने आणि अपेक्षित ठिकाणी प्रवेश करत आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रतिवर्षी ही चाचणी घेतली जाते. .