चिपळूण : नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याचा तोतया पोलीस अधिकारी बनून चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील एका ज्येष्ठ डॉक्टरला तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंड. ३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या सायबर फसवणुकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे..बामणोली डिंगणकरवाडी येथील ६५ वर्षीय डॉ. विलास महादेव ओक यांनी यासंदर्भात चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.