BAN vs WI 2nd Test Towhid Hridoy : बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी सिल्हेट येथे खेळवली जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा फलंदाज तौहीद हृदोयने नाबाद द्विशतकी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. एकेकाळी 184 धावांत 7 विकेट्स गमावलेल्या बांगलादेशचा डाव 200 धावांच्या आत आटोपेल, असे वाटत होते. मात्र, तौहीदच्या झंझावाती खेळीमुळे बांगलादेशने पहिल्या डावात 386 धावांचा टप्पा गाठला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तौहीदने एका बाजूने किल्ला लढवला.