नेतान्याहू यांना केवळ 46 खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे, अध्यक्ष त्यांना सरकार स्थापन करण्याची पहिली संधी देणार नाहीत, असे मानले जात आहे. इस्रायलमध्ये आजपर्यंत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. Benjamin Netanyahu vs Gadi EisenkotSource : PTI Benjamin Netanyahu vs Gadi Eisenkot: अध्यक्ष आयझॅक हर्झोग उद्या (8 नोव्हेंबर) इस्रायलच्या पुढील पंतप्रधानांची घोषणा करतील. सरकार स्थापन करण्यासाठी 61 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. गडी आयझेनकोट यांच्या आघाडीला सहा पक्षांतील 67 खासदारांचा पाठिंबा आहे.