Kolhapur Ambap News : कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे बीडवरून आलेल्या ऊसतोड मजुरांच्या टोळीतील 9 लहान मुलांसह एका गर्भवती महिलेला एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अंबप गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या 9 लहान मुलांसह एका गर्भवती महिलेला अचानक अन्नातून अथवा एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने भीषण विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. बाधित सर्व मजूर बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीच्या कामासाठी कोल्हापुरात आले होते.