Satej Patil On Gokul News: गोकुळच्या अध्यक्षपदावरून सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. तसेच गोकुळ अध्यक्षपदाचा पेच सोडवण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन्ही गटांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी ट्विटद्वारे त्यांना उत्तर दिले आहे.