पोलिसांनी मुदतीत म्हणजे ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही. याचा फायदा आरोपीला झाला. न्यायालयाने त्याला जामीन मंजुर झाला. Pune News – जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात विहित मुदतीत म्हणजे ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल न करणे पोलिसांना महागात पडले आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, आरोपी संतोष मनासाराम चव्हाण याला डिफॉल्ट जामीन मंजुर केला आहे. प्रणित नामदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. विश्रामबाग पोलिसांच्या हद्दीत हा जबरी चोरीचा प्रकार घडला.