Assistance for drought affected farmers: तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली मदतही मिळणार. सातारा : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या दिवाळी अग्रीम मदतीपैकी ५ नोव्हेंबरअखेर ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४ हजार ३७२ कोटी ८३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४६७ शेतकऱ्यांना १५० कोटी ७३ लाख रुपयांची मदत मिळाली आहे.