१.२९ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाची धावपळ : २६ विहिरी-बोअर अधिग्रहित. सांगली : जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, ६१ गावे आणि ४३५ वाड्यांमधील एक लाख २९ हजार ५९० नागरिकांना पिण्याचे पाणी ६० टँकरद्वारे पुरवले जात आहे. स्थानिक पातळीवरील खासगी विहिरी आणि बोअर अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.