धुळे-सोलापूर महामार्गावर मुरूम चोरी रोखणाऱ्या महसूल पथकावर तस्करांची दादागिरी, चौघांवर चिकलठाणा ठाण्यात गुन्हा. छत्रपती संभाजीनगर : शासकीय जमिनीतील गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकालाच उत्खनन करणाऱ्यांनी लक्ष्य केले. दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने शासकीय जमिनीतून मुरूम आणि मातीचे उत्खनन करून पाच हायवांमधून त्याची वाहतूक सुरू असताना पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उत्खनन थांबविण्यास सांगताच चौघांनी पथकाला विरोध केला. मंडळ अधिकारी शेखर शिंदे यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.