अडचणीत आलेल्या भारताला केएल अन् पावसानं वाचवलं... दुसरा सामना खिशात घालत न्यूझीलंडविरूद्ध केला खास विक्रम. NZ vs IND 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना भारताने ४ धावांनी (DLS Method) जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचे १३५ धावांचे आव्हान पार करताना भारताने ७ बाद ११३ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र पावसाच्या व्यत्यायमुळं सामना रद्द करून निकाल डीएलएस मेथडनुसार देण्यात आला.