Mumbai Local Train Fight Video: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी रात्री चर. शुक्रवारी रात्री चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणादरम्यान एका प्रवाशाचा तोल गेल्याने तो थेट चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडला. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली..मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.