Chhatrapati Sambhajinagar Vaijapur Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधून जुन्या वादातून तरुणाला चौकाचौकात नेऊन मारहाण आणि पाणी मागितल्यावर तोंडावर लघवी केल्याचा संतापजनक आरोप करण्यात आलाय. बीडच्या संतोष देशमुख हत्या (Crime News) प्रकरणाची पुनरावृत्ती वैजापूरमध्ये पाहायला मिळालीय. वैजापूरमधील रोहित पठारे हत्या प्रकरणात आज पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीय भावनिक झाले आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी केलीय.