नांदेड : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर, सोनखेड पोलिसांनी अवैध. गोदावरी नदीपात्रातून शासनाची कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी न घेता चोरटी रेती वाहतूक करणारे तीन हायवा ट्रक आणि १५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी २० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.