--- पान ६ नांदेड ----हळद उत्पादकांना विमा परताव्याची प्रतीक्षा.पावसाच्या खंडामुळे नुकसान; १४ हजार १३ पीकविमा अर्ज.ॲग्रोवन वृत्तसेवानांदेड : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेल्या ओढीचा फटका जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सलग ३० दिवसांत एकूण ५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यास लागू होणाऱ्या कमी पावसाच्या ट्रिगरनुसार हळद उत्पादकांना विमा भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. .