राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयात असताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी त्यांची भेट घेतली नाही. उपमुख्यमंत्री कार्यालयाने तीनदा भेटीची वेळ मागितल्याची माहिती आहे, तर जय पवारांनी फोनवरून तब्येतीची चौकशी केली. त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीबद्दल चर्चा सुरू होती आणि आता त्यांना वैद्यकीय निरीक्षणातून मुक्त करण्यात आले आहे.