जपानमध्ये एका भारतीय महिलेने चक्क 40 हजार रुपये खर्च करून खास कस्टमाइज्ड उशी खरेदी केली आहे. या उशीमध्ये असं नेमकं काय खास आहे की, तिच्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली? महिलेच्या या अनोख्या खरेदीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चांगली झोप मिळावी यासाठी अनेक जण आरामदायी गादी आणि उशी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, एका भारतीय महिलेने चांगल्या झोपेसाठी चक्क ४० हजार रुपये खर्च करून खास उशी खरेदी केली आहे.