विजय मल्ल्या यांच्या कॅलेंडरमधून एका अभिनेत्रीला मोठी ओळख मिळाली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून पूनम पांडे आहे. या कॅलेंडरनंतर आपल्याला एक वेगळी ओळख मिळेल, असे तिला वाटत होते. पण प्रत्यक्षात वेगळे घडले. पूनम पांडे आणि वाद हे समीकरण बघायला मिळते. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य करताना अनेकदा पूनम पांडे दिसते. शुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला किंगफिशरचे कॅलेंडर शूट करण्याची मोठी संधी मिळाली होती, असे तिने म्हटले.