कोल्हापूर : राजकारणात जय-पराजय होत असतात. विजयाचा जल्लोष असावा; पण उन्माद असू नये. विजयाच्या नशेत थेट मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्यापर्यंत मजल जाणे, हे आम्ही क. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमधील विजयाचा उन्माद केल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. तसेच सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न आता केला, तरी महायुती सहकार्य करेल का, याची वेळ निघून गेली आहे. हा प्रयत्न त्यांनी यापूर्वीच करायला हवा होता,’ असेही मुश्रीफ यांनी सुनावले..