बीजिंग : एकीकडे फॅक्टरीमधील मानवांचे काम रोबो हिरावून घेतील, अशी भीती लोकांना वाटत आहे, तर दुसरीकडे एका नवीन प्रयोगातून असे समोर आले आहे की, कधीकधी मशिन आणि रोब. चीनची रोबो बनवणारी कंपनी 'एजीबॉट'ने (Agibot) नुकताच एक लाईव्हस्ट्रीम चॅलेंज आयोजित केला होता. यामध्ये त्यांच्या सहा ह्युमनॉईड (मानवासारखे दिसणारे) रोबोंचा समावेश होता..या रोबोंना शांघायच्या शुहुई जिल्ह्यातील एका स्टोअरमध्ये २४ तासांच्या शिफ्टवर कामाला लावण्यात आले होते.