#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे एमपीसीबीनं ठाण्यात घेतलेल्या फटाक्यांच्या ध्वनी चाचणीत 'ऑल आऊट ५०००' या फटाक्यानं तब्बल १११.८ डेसिबल आवाजाची नोंद केली. फटाक्यांमुळं होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा तो उच्चांक ठरला. 'कुरवी चिमणी' या फटाक्यामुळं सर्वात कमी म्हणजे ७४.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली. उच्च न्यायालयानं दिलेल्या प्रदूषण नियंत्रणाच्या आदेशानुसार वागळे इस्टेट परिसरात महापालिका, पोलीस आणिी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १९ प्रकारच्या फटाक्यांची मोकळ्या मैदानात चाचणी घेण्यात आली.