#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics विरार पूर्वच्या चंदनसार परिसरात भरवस्तीत असलेल्या फटाक्यांच्या बेकायदेशीर कारखान्याचा क्राईम युनिट दोनच्या पथकानं पर्दाफाश केला. निवासी परिसरात असुरक्षित पद्धतीनं हा कारखाना सुरू असल्यानं तिथं मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. फटाके विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मर्चंट दुकानाच्या वरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर हा कारखाना सुरू होता. पोलिसांनी तिथं धाड टाकली असता, १७ कामगार फटाके तयार करत असल्याचं आढळून आलं.