#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पश्चिम रेल्वेनं यंदा तिकीट तपासणी मोहीमेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेनं एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांमध्ये ३८ कोटींहून अधिक रकमेचा महसूल मिळवला आहे. या मोहिमेअंतर्गत १७ लाख ९३ हजार विनातिकीट किंवा अनियमित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वातानुकूलित उपनगरीय लोकल गाड्यांमधील तिकीट तपासणीच्या प्रकरणांत ८२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात दोन लाख ४४ हजारांहून अधिक विनातिकीट आणि अनियमित प्रवासी आढळून आले.