13456, 13457 फोटो- मृत पंकज ठाकरे कोल्हेर-अहिवंतवाडी-पिंप्री अंचला रस्त्यावर उलटलेला ट्रॅक्टर. कोल्हेर शिवारात अपघात; एक ठार, एक जखमी सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ६ : पिंप्री अंचला-अहिवंतवाडी मार्गावरील कोल्हेर शिवारात शुक्रवारी (ता. ६) सकाळी रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात पंकज प्रकाश ठाकरे (वय १७, रा. अहिवंतवाडी) याचा मृत्यू झाला, तर ओंकार अशोक भुसार (१८) गंभीर जखमी झाला.