पाताळेश्वर चौकात तरुणास मारहाण शिरपूर : शहरातील पाताळेश्वर चौकात तरुणाला मारहाण केल्यावरून तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीची घटना ८ सप्टेंबरला रात्री साडेदहाला घडली होती. जखमी समीर शहा फिरोज शहा (वय २१, रा. मच्छी बाजार, शिरपूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरव नरेंद्र बोरसे, आकाश महेंद्र बोरसे व दिक्षू संतोष थोरात (सर्व रा. खालचे गाव बौद्धवाडा, शिरपूर) यांनी त्याला शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी व लोखंडी कड्याने मारहाण केली.