Shehzaad Poonawalla : शहजाद पूनावालानं तेज प्रतापवर घणाघात केला असून त्याला भारतीय राजकारणाचा जोकर असं म्हटलं आहे. भाजपचा माजी प्रवक्ता शहजाद पूनावालानं ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'राईज अँड फॉल' सीझन २ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि प्रियांका चहर चौधरी व गौतम गुलाटी यांचा पराभव करून ते विजयी ठरला. त्यानं ३५ लाख रुपयांचं बक्षीस देखील जिंकलं असून ते पैसे बिहार आणि आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दान करण्याचं वचन दिलं.