#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics मुंबईतल्या लोअर परळ येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात आज ५५७ रहिवासी कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या सदनिकेची चावी देण्यात आली. लोअर परळच्या ना. म. जोशी मार्गावरच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात तीन इमारतींचं काम पूर्ण झालं आहे. या बीडीडी चाळीतल्या १६० चौरस फुटांच्या खोलीऐवजी तिथल्या रहिवाशी कुटुंबांना नव्या इमारतीत ५०० चौरस फुटांची सदनिका मिळाली आहे. या सदनिकेची चावी देण्यासाठीच्या कार्यक्रमाचं चर्चगेटच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं.